Sunday, 23 April 2017

तू तिथे अन् मी इथे...

तू तिथे
मी इथे...

तू सुखात
मी विवंचनेत...

तू सदा उत्साही
मी सदा व्यापात...

तू वर्तमानी खूश
मी आठवणीत मूक

तू स्वच्छंदी रसिक
मी गूढ अरसिक...

तू सर्वत्र व्याप्त
मी पर्याप्त मात्र...

तू सदोदित
मी कदाचित...

तू मनःस्वार
मी जीवनसार...

तू जीत
मी त्याची हार...

तू हुरहूर
मी काहूर...

तू पाऊलवाट
मी पाऊलखूण...

तू प्रेम
मी हृदय...

तू श्वास
मी....तुझा विश्वास !