लामण दिव्यातील मंद तेवणारी ती काजळवात !
संध्यासमयी तुझी हुरहुर लावते.
का कुणास ठाऊक मन अधीर होते तिचे !
लामणदिव्यातील त्या ज्योतीचे ते आसन किती स्तब्ध असते,आकंठ बुडालेली असते ती त्या तेलात पण तिच्यातली ती आतुरता वा-याच्या झुळुकीबरोबर सतत डोलायमान होत असते केवळ तुझ्या समर्पणासाठी!
कळततंय का रे तिच्या आतली तळमळ ?
भरगच्च आग असलेल्या त्या तिच्या शरीरात फक्त ओलावा असतो त्या काजळाचा !
त्या गर्द काळ्या काजळाने तिचे डोळे सतत तुला शोधत असतात. तुझ्या सानिध्यात येऊन काठोकाठ भरलेले ते थंड काजळाचे घट कधी एकदा रिकामी होतात अशी आस धरुन तुझी वाट पाहत असतात अनंतकाळासाठी.....!
#Shilpa____