Wednesday, 22 February 2017

बाळ

नजरेतून बोलतोय गं, जन्म दिलायंस न मला
बहरलोय गं कुशीत तुझ्या, स्पर्शून घे न मला...!

प्रसव वेदना असह्य, अगतिक किती होत्या गं तुला
त्याच धीरानं, त्याचं नेटानं जन्म दिलायंस न मला...!

गोब-या गालाच्या लालीला चुंबून घे गं जरा
माय माझी प्रेमळ, लाडिक कवेत घे न मला...!

गच्च तहानले ओठ माझे 'आई ' म्हणतायत तुला
मातृत्वाने भरली आज तू 'बाळ ' म्हणतेयंस मला...!

#Shilpa#

सवय

सवय नाही मला तुझी
पण तू हवा नेहमी सोबत...
गवतफूल नाही का
टिकते नेहमी गवतासोबत...

ये ना सखे !

कुणास ठाऊक कोण, कोणात गुंतले... 
अधीर श्वास ते दोघां उरात गोठले...

जे होते ते प्रारब्ध म्हणावे आपले...
सारे मर्म ते नाजूक स्पर्शात साठले...

तोडावी ती नीती अनीतीची किवाडे...
तृप्त करावे मनी काहूर ते माजले...

ये न सखे ! माघारी का हून वळावे...
आल्या क्षणा का असेच उगा दवडावे...

Sunday, 5 February 2017

आभाळ

आज पुन्हा दाटून आलंय आभाळ
बरसावं की उरात साठवावं आभाळ...

Thursday, 2 February 2017

काहीतरी

आज लिहिताना चुकतंय काहीतरी आतून...
येत नाहीत ते भाव नेमके हृदयातून...!

तू नाहीस जवळ ते कळतंय ह्यातून...
पण खरंच मी रोज लिहिते रे अंतरमनातून...!

#Shilpa#