Tuesday, 9 June 2020

गवाही

किसी चीज़ की गवाही नहीं दे सकती,
हाँ पर इश्क कटघरे का मोहताज नहीं

राह !

एक-एक दिन गायब रहते हो,
बताओ तो सही कहाँ रहते हो ?

गालिब के शेरों में,
या उमराव की अदा में,
होते कहाँ हो, डूबती हुई शामों में ?
आने की आहट, ना कोई डाक है  तुम्हारी,
हवा से बकायदा दस्तक भी ना तुम्हारी !

ओढ़ती हूँ पश्मीना तो मलमल से याद आते हो...!
एक-एक दिन गायब रहते हो,
बताओ तो सही कहाँ रहते हो ?

नशा रखते हो इश्क का,
मयखाने तो नहीं लूटते ना ?
घूँट-घूँट उताकर,
दिल की बस्ती में तो नहीं बसते ना ?

बिखरकर निखरती हूँ मैं दुवाओं में अक्सर,
माँग बैठती हूँ तुम्हें "या खुदा" कहकर !
भूले भटके ही आना मेरी गली तुम,
किसी रोज़ ले जाना मुझे मौला-सा तुम !

जिधर जाते हो वहाँ की लहर भेज देना,
मलय-सी बेकरार कसक भेज देना !
यहाँ भी अकेला है बिन तुम्हारे कोई,
जरा थोडी ये बात जहन डाले देना !

तरसता है कोई तुम्हें देखने ऐ  साहिब,
पल दो पल का सही, साथ ही भेज देना !

जहाँ रहते हो एक-एक दिन वो राह भेज देना !

____________Shilpa

मैं....नदी

पानी में पानी बनकर बहती है वो,
प्यासी तो नदी भी है और मैं भी !

#Shilpa___

Tuesday, 28 April 2020

चाफा

तुझ्या असण्याची जादू अनुभवली आज...
स्पर्शून गेलीस तू अन् चाफा झालो आज....!

इजाजत

इजाजत लूँ तुमसे या,
ठहर जाऊँ आज यहीं...!
बताओ तो,
कहर तुम लाओगी या रात...!

#Shilpa___
Shanu Shilpa Kumud......,🌹🌹

बकुळ

उराशी कवटाळून घे न मला,
बकुळीची लाजही ओंजळीत दरवळेल जरा...!

#Shilpa___

हिरा

आज तुझ्या मिठीत एक नवीन बात अनुभवली अरे !
गच्च कोंदणात जसा ठसठशीत हिरा असतो ना अगदी तशी बात !
काय सांगू तुला ! किती चमक होती माझ्यात !
दोन हातांचे स्वर्ण कोंदण होतं माझ्याभोवती !
माझं शरीर कोणत्यातरी प्रकाशझोताकडे घेऊन निघालं होतं मला !
किती लकलकावं रे त्या नाममात्र हि-याने !
एक वेगळीच दमक !
त्या कोंदणमिठीचा स्पर्श मला हे वारंवार सांगत होता की तू फक्त माझी आहेस. मी तुला कुठेही नजरेआड होऊ देणार नाही !
एक निराळीच अनुभूती मिळत होती मला...!
आश्वस्त वाटत होतं अरे मला त्या कोंदणात !
ती मिठी ह्या तुझ्या हि-याला लाजेनं चूर होणं शिकवत होती अरे !

एक सांगू तुला !
नीट ऐक हं !
तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकते
पण त्या धडधडीचीही एक मौनाची भाषा आहे अरे !
ती फक्त अन् फक्त मलाच कळते !
ती धडधड मला तुझ्यावर जीव लावणं शिकवते, जीव ओवाळून टाकणं शिकवते....!
ती मला तुझ्यापासून दूर जाऊच देत नाही !
ते असतील तुझ्या हृदयाचे ठोके वगैरे !
पण माझ्यासाठी तर ते माझे अस्तित्व आहेत...!
ह्या धडधडीशिवाय मी नाही अरे !

तुझा हा हिरा, तुझ्या कोंदणमिठीसाठी सदा आसुसलेला राहिल आयुष्यभरासाठी तुझाच होऊन !

#Shilpa___

प्रेम

प्रेम असं असतं का रे ?
कितीही केलं तरी पुरे होत नाही,
अन् पुरे म्हणलं तर,
अजून-अजून हवं असतं !
असंख्य फुलपाखरांचा वावर असतो आताशा मनात,
भिरभिरत राहतात ती तुझ्याभोवती !
तुझी ती मधाळ फुलं हवीहवीशी वाटतात रे !
खोलवर रुजत जाते रे मी तुझ्यात,
पाण्याचा प्रत्येक घोट जसा तृप्त करतो मला !
तुझं अस्तित्व आधार देतं मला,
जसं बीज अंकुरताना मातीचा सहवास असतो,अगदी तसा !

सांग न ?
प्रेम हे असं असतं का ?
रात्र-रात्र तुझ्या मिठीत जागून पहाट होऊच नये असं वाटणं ?
हे असावं बहुधा प्रेम !
मला प्रेम भरभरुन करता येतं रे पण शब्दात नाही मांडता येत !
असं वेडं, भाबडं असतं का रे प्रेम ?

सदा तू बरोबर असावास,
हल्ली फार वाटतं !
जशी झुळूक असते न त्या वा-यासोबत अगदी तसं काहिसं !
बहुतेक असंच असतं प्रेम,
जे मनाला सुखावतं !
ओल्या मेंहदीच्या गंधातून,
जे तळहातांना रंगवतं !

खरं सांगू !
रंगलेल्या हातांनी फक्त तुलाच कुरवाळणं हेच ते प्रेम !
तुझ्या ओठांनी हलकेच टिपलेला,
तो माझ्या तळहातांचा स्पर्श...!
आहा.....!
हेच ते प्रेम मला माहित असलेलं,
बेभान होऊन जे लाडात मांडलेलं !

#Shilpa____

तुम ही सही

मैं जबरन कुछ नहीं चाहती,
हौले से मिले,वो तुम ही सही...!

#Shilpa___

काजळ

आज काहीतरी वेगळं होतं तुझ्यात..!
एकतर मी तुझ्या काळजात होते,
किंवा तू माझ्या काजळात...!

#Shilpa____