Sunday, 22 January 2017

प्रेम

"प्रेम" हा शब्दच किती नाजूक आणि हळवा. अखंड स्पर्शात ओसंडून बरसणारा..! प्रेम कसं असावं ?....
  
    प्रेम मनसोक्त, मनमुराद आनंद देणारं हवं...!
    कुणीतरी वेड लावून प्रेम करणारं हवं...!
    झपाटल्यासारखं,बेधुंद तिच्यावर मरणारं हवं...!
    तिचं सारं दुःख आपलं समजणारं हवं...!
    फुलपाखरासारखं फुलावर बसणारं हवं...!
    प्रेमासाठीच प्रेम आतुरलेलं हवं...!
    प्रीतीचा कटाक्ष ,अलवार पणं तिला भेदणारं हवं...!
    ओंजळभरुन नितांत वाहणारं हवं...!
    तिच्या हृदयात, तनमनात तरंगणारं हवं...!
    तिच्या नितळ कांतीला बिलगणारं हवं...!
    सोड म्हणून मागे लागली जरी ती,
    तरी हट्टाने तिला कुशीत घेणारं हवं...!
    तिच्या श्वासात उमलणारं हवं...!
    तिच्या  गाण्यात गाणारं हवं...!
    तिच्या स्पर्शात रोमांचित होणारं हवं...!
    मित्रांनो...! मला माझं प्रेम बोलणारं हवं...!
                   मला माझं प्रेम भावणारं हवं...

    काहीही झालं देवा, तरी
                              मला माझं प्रेम हवं...!
                              मला माझं प्रेम हवं...!

#Shilpa#

Sunday, 8 January 2017

चंद्र

दिवसा नाही तर नको
पण रात्री ये मजकडे...

तो चंद्र बघ....! नसतो दिवसा
पण रात्री वळतोच चांदण्यांकडे...

#Shilpa#

Saturday, 7 January 2017

बहर

प्राजक्ताचा बहर पाहिलाच नाही आज
तुला पाहिले अन् बहरुन गेले आज...!

#Shilpa#

दरवळ

अत्तराची कुपी सांभाळून ठेव हा जरा
मीच दिलीय आठवण म्हणून जवळ ठेव हा जरा...!

संपेल जरी थेंब त्यातला दरवळ संपणार नाही
संपेन जरी मी उदया प्रेम संपणार नाही...!

#Shilpa#

Wednesday, 4 January 2017

अंतर

वाढलेय तुझ्या माझ्यातले अंतर आता
चंद्र ही येत नाही भेटीस आता...
वाट बघणे होईल की नाही आता
रात्रीसव मिटेन मी कधीही आता...

....शिल्पा....

गंध

श्वास थांबलाय रे माझा
माळतोयस ना...
गंध बहरलाय रे तुझा
पांघरतोयस ना...

.....शिल्पा.....

वेळ

काहीच सुचत नाहीय आज...
काय झालंय आज ?
बघ तुला काही सुचतंय तर
वेळ मारून ने ना आज...

....शिल्पा....

श्वास

आयुष्यभर उरात सांभाळावा असा एकमेव श्वास.....तू

.....शिल्पा.....

Tuesday, 3 January 2017

मुक्त प्रेम

प्रेमाला प्रेमातून मुक्त करता आले असते...
तर खूप बरे झाले असते...
तू तिथे आणि मला इथे निवांत राहता आले असते...

सांजवात

सांजवातीला स्मरुन
प्रेम केले तुझ्यावर...
चंद्र ही होता साक्षीला
परी नाही भुलले त्यावर...

#Shilpa

आवर

सोडू नकोस असे त्यांना..

आवरता येत नाही रे त्यांना !

विस्कटतात खूप...ऐक जरा..!

तुझ्यात गुंतावे लागते पुन्हा त्यांना !

#Shilpa#

हिरवा चुडा

जसा मनात बागडतोस ,
तसा हातात बागडशील ना !

प्रेम करते रे तुझ्यावर ,
हिरव्या चुड्यात रमशील ना !

#Shilpa#

वाट

मखमली पायघड्यांची वाट,
तूच दिली होती...!
काट्यातून चालायची,
इच्छा मात्र तुझीच होती...!
फरक काही फार नाही,
तडजोडीत प्रेम होते...!
अजूनही टिकावे म्हणून,
तुझे माझे प्रयत्न होते...!

कायम..

खूप दूर आहोत दोघे, तरी ओढ कायम आहे
काही प्रश्न निरुत्तरी तरी...प्रश्न कायम आहे..!

तुझ्या प्रेमावरला माझा विश्वास, अगदी कायम आहे
नक्की बहरेल प्रेम माझे, ह्याचा बहर कायम आहे..!

न बोलून ही कळले मला, तुझा साथ कायम आहे  
वातीसाठी जळतो दिवा,तसा सर्वांगी दाह कायम आहे..!

#Shilpa#

तुझ्याविना

तुझ्यात जग सामावले आहे माझे...
तू जवळ असताना ही...नसताना ही...

तुझे दोन दिवस

तुझे दोन दिवस हवे होते मला...
तू तर जन्मठेपच दिलीस मला...!