Saturday, 18 March 2017

बाबा

खूप दिसांनी आज त्याला 
रडताना पाहिलंय...
आई गेली सोडून तेव्हा
गहिवरताना पाहिलंय...

आज तोच खूप रडला
आठवणींना घेऊन...
बापाला ही हृदय असते
हीच जाणीव ठेऊन...

.........बाबा !

Thursday, 9 March 2017

सत्य

भारावले नाही, पूर्ण शुद्धीत आहे आज
सहज,सरळ,पार मनात, उतरलंय सत्य आज..

खोट्या स्वप्नातून, पुरती जाग आलीय आज
तुझ्या श्वासांच्या कैदेतून, मुक्त झालीय आज...

कितपत फसवत राहू स्वतःला, तू आहेस आज
कधीतरी यायचेच होते, नेमके भानावर आलेय आज...

एका चुकीच्या प्रेमाची शिक्षा, किती मिळालीय आज
तू नाहीस हेच सत्य, जे पार मनात उतरलंय आज...

#Shilpa#

कादंबरी

तो म्हणाला...

ओठांवर ओठ टेकवलेस तर गझल लिहिशील..
मनातला सूर्यास्त पाहशील तर चारोळी लिहिशील..
आता ठरव सखे तुला काय लिहायचंय...!

ती म्हणाली..

ओठ अन् मनाच्या क्षितीजाची एक रचना करते पटकन..
मालिकेतल्या सूर्या, तुझी कादंबरीच लिहिते पटकन..!

#Shilpa#

शब्द

दिले तुलाच शब्द
मन मोकळे कराया....

श्वास हा मिठीचा
हलकेच सोडवाया....

#Shilpa#

Monday, 6 March 2017

तुझीच

तू जवळ असलास की जग विसरते मी
कळत नाही कुठल्या तंद्रीत स्वतः हरवते मी...

मन नाही,श्वास नाही कुठेच नसते मी
तुझ्या अंतरंगी शिरुन मात्र तुझीच होते मी...

#Shilpa#

Wednesday, 1 March 2017

असं हसं

असं हसं ....

तुझ्यात अडकलेय
अन् माझं असं झालंय...
कुलूपाच्या किल्लीचंही
अडकूनचं हसं झालंय...

#Shilpa#

मी

त्याने सहज प्रश्न केला
तुझ्यात मी असतो केव्हा ?
म्हणाली, कुंकवाची लाली लावते जेव्हा
अन् रात्री श्वास देतोस तेव्हा...!

#Shilpa#