तू म्हणतोयस की माझा चेहरा बोलका आहे. माझं नशीब रे की तुला चेहराही वाचता येऊ लागला. कधी शिकलास हे असं वाचायला ? बहुतेक माझं तुझ्यासोबत नसणं वेडपिसं करतं तुला...हो न ? म्हणून मग माझा चेहरा नजरेसमोर ठेऊन जगवत असतोस स्वतःला आणि जगण्यासाठी शिकावं लागतं म्हणूनच वाचत असतोस मला ! तुझं ना काहीच कळत नाही बघ...!
मला इतकं जवळून कधी वाचलंस सांग ? हल्ली माझ्या पापण्यांतही तुला तुझा विसावा मिळतो म्हणे ! कालच ऐकलं तुझ्या तोंडून म्हणालास, की शांत, निवांत वाटतंय गं ह्या काजळ सावलीत ! त्याचाच मंद शीतलपणा अंगावर पांघरून पहुडलेला तू....तुझं ते गहिरं रुप मलाही वाचता येऊ लागलं रे !
काय कमाल आहे बघ !
हा अजब बोलकेपणा जर आपल्या दोघांत आहेच तर मग अडलं कुठे रे ?
#Shilpa____
No comments:
Post a Comment