तुझं ते अधीर होऊन,
घास भरवणं
माझ्या ओठांना,
तुझ्या बोटांचा स्पर्श होणं...
काय वाटतं तुला...?
कळत नाही का मला...?
मनातला प्रत्येक भाव,
मी ओळखणं...
तू काहीच,
न झाल्याचं दाखवणं...
तुझ्या हर नख-यात,
मी मला शोधणं...
तू मात्र नव्याने,
स्वतःत हरखणं...
बस कर ना आता...!
किती त्रास देशील ?
स्वतःला अन् मला देखील...
आण तो मोगरा अन्
घे अजून एक कारण
मला स्पर्शून जाणारं...
तो मोगराही खूश अन् तूही...
भान हरवून निघताना तू
अडचण स्वतःचीच करशील...
मोगरा असेल त्याच्या जागी...अरे !
तू काही तुझा नसशील...
तू काही तुझा नसशील....!
#Shilpa...
No comments:
Post a Comment